सावंतवाडी,दि.०६: व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग ची सर्व साधारण सभा कुडाळ एमआयडीसी येथील विश्रामगृहात संपन्न झाली.
यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी प्रहार डिजिटल चे ब्युरोचीफ सिद्धेश सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी त्यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
व्हॉइस ऑफ मीडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे तसेच कोकण विभागीय अध्यक्ष अरुण ठोंबरे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली.
यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष परेश राऊत,कार्याध्यक्ष समीर महाडेश्वर,आनंद धोंड, महासचिव संजय पिळणकर, सहसचिव अमित पालव, खजिनदार शैलेश मयेकर, सहखजिनदार वासुदेव उर्फ नयनेश गावडे,उपाध्यक्ष मिलिंद धुरी,भूषण सावंत,विष्णू धावडे,संघटक आनंद कांडरकर,सल्लागार डॉ.बी.एन खरात, नागेश दुखंडे, प्रथमेश गवस आदी जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.