रोणापाल येथील खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात सौ.नमिता न्हानू शेगडे विजेत्या..

0
18

सावंतवाडी,दि.१६ : तालुक्यातील रोणापाल येथील श्री. देवी माऊली मंदिर व श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ रोणापाल यांच्या वतीने नवरात्रौत्सवानिमित्त आयोजित ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात विजेती सौ. नमिता न्हानू शेगडे विजेत्या ठरल्या. त्यांना मानाची पैठणी, सन्मान चिन्ह, श्रीफळ देऊन प्रकाश गावडे व प्रफुल्ला गावडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांक सौ. प्रिया गंगाराम गाड, तृतीय क्रमांक सौ. दिशा दीपक परब यांनी पटकावला. द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकांना अनुक्रमे साडी, सन्मानचिन्ह, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदर स्पर्धा प्रकाश गावडे व प्रशांत गावडे यांनी पुरस्कृत केली होती.

रुपेश पाटलांची निवेदनाची धमाल, वहिनींच्या शानदार उखाण्यांची कमाल.!
रोणापाल येथील ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमासाठी सर्वात कमाल केली ती स्पर्धेसाठी निवेदन करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक प्रा. रुपेश पाटील यांनी.
प्रा. रुपेश पाटील यांनी आपल्या बहारदार शैलीने स्पर्धेत सहभागी असणाऱ्या महिलांना बोलके करून रोजच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर आणत त्यांच्या कला – कौशल्यांना वाव देणारे, तसेच प्रत्येकाच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना ओळखत त्यांना त्यांची जाणीव करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. तसेच सहभागी प्रत्येक महिला स्पर्धकाला आपल्याकडे असलेल्या विशेष गुणाची ओळखही करून दिली.

सहभागी महिलांनी उधळले कलारंग –
सदर स्पर्धेमध्ये सौ. कशिदा गावडे सौ सोनाली गावडे, सौ. प्रफुल्ला गावडे, उज्वला गावडे, नमिता गावडे, अश्विनी गावडे, लक्ष्मी तुयेकर किशोरी नाईक, सुंदरी भोईटे, वैदही गावडे, प्रिया गाड, दीक्षा परब, उज्वला देऊलकर, स्नेहल गावडे अनादि गावडे आणि उर्मिला तुयेकर, देविका देऊलकर जानकी गावडे यांसह रोणापाल गावातील महिलांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. सहभागी सर्व महिला स्पर्धकांनी शानदार उखाणे, गाणी, चुटकुले आदी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी व्यासपीठावर मंडळाचे सचिव विष्णू सावंत, खजिनदार बाबल तुयेकर, सहसचिव मंगेश गावडे, सुधीन गावडे, तानाजी गावडे, वामन गावडे, परशुराम गावडे, मोहन गावडे, निलेश नाईक, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर नेमण, न्हानू शेगडे, गंगाराम गाड आदी उपस्थित होते.

श्री. देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम यांना चालना देत आले आहे. या मंडळाचे वर्षभर अनेक उपक्रम राबविले जात असतात, अशी प्रतिक्रिया प्रकाश गावडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here