कोलगाव पांडव नगरी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाबुराव चव्हाणांची सलग सातव्यांदा बिनविरोध निवड

0
76

सावंतवाडी,दि.१९ : कोलगाव-पांडव नगरी येथील श्री देव वस नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाबुराव चव्हाण यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या सात वर्षांपासून ते सातत्याने या मंडळाचे अध्यक्षपद यशस्वीपणे भूषवत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळाची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.

नव्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी विजय चव्हाण, सचिवपदी आनंद चव्हाण, तर सहसचिवपदी रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. मंडळाचे पुजारी व खजिनदार म्हणून सदानंद चव्हाण, सहखजिनदार म्हणून अमोल चव्हाण आणि कार्याध्यक्ष म्हणून ॲड. स्वप्निल कोलगावकर हे जबाबदारी सांभाळतील. पत्रकार सागर चव्हाण यांची मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तीन दशावतारी नाटके, कीर्तन-प्रवचन, फुगडी, दांडिया आणि भजनाच्या कार्यक्रमांचा समावेश असणार आहे, अशी माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष बाबुराव चव्हाण यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here