सावंतवाडी भाजपा च्या वतीने आज योग दिन साजरा..
सावंतवाडी,दि.२१: भारतीय जनता पार्टी च्या वतीने आज सावंतवाडी राजवाडा येथे योग दिवस साजरा केला. यावेळी बोलताना भाजपचे युवा नेते संदीप गावडे म्हणाले की, “प्राचीन आणि सनातन भारताची योग ही एक अनमोल देणगी आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यावर संयुक्त राष्ट्र परिषदेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा ठराव मांडला, ज्याला १७२ देशांनी पाठिंबा दिला आणि तो मंजूर झाला.
श्री गावडे पुढे म्हणाले पंतप्रधान मोदींनी योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन या परंपरेचे जतन करण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे.
या योग शिबिरात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, जिल्हा बँक संचालक रवी माडगावकर, मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, मिसबा शेख, दिलीप भालेकर, सागर ढोकरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी योग मार्गदर्शक म्हणून प्रदीप्ती कोटकर आणि रिया सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.