आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कोकिसरेतील उबाठा व राष्ट्रीय काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

0
33

सोसायटी व्हा. चेअरमन मधुकर पाटेकर, संचालक दिलीप नारकर यांचा समावेश

वैभववाडी,दि.२५: तालुक्यातील कोकिसरे गावातील उबाठा व राष्ट्रीय काँग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आमदार नितेश राणे यांनी भाजपात जंगी स्वागत केले. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सोसायटीचे व्हा. चेअरमन मधुकर पाटेकर, मा. संचालक दिलीप नारकर, मंगेश वळंजू, संतोष सावंत, निलेश पालकर, दशरथ पालकर, रणजीत पाटेकर, गोपाळ सावंत, नागेश जाधव, विश्राम रोगे, विजय बेळेकर, अनिल मोहिते, निलेश पालकर, नारायण नारकर, बापू बेळेकर, आदित्य पाटेकर, रवींद्र पालकर व इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यात महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. यावेळी कोकिसरे गावच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांनी भरघोस निधी दिला आहे . तालुक्याचा विकास हे आमदार नितेश राणेच करू शकतात. असा विश्वास व्यक्त करत सर्व कार्यकर्त्यांनी आज भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
भाजपाचे पदाधिकारी भालचंद्र साठे, बंड्या मांजरेकर, दत्ताराम सावंत, बंधू वळंजू, प्रदीप नारकर यांच्या प्रयत्नाने हा पक्ष प्रवेश पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here