सावंतवाडी,दि. १७: निगुडे गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री देवी माऊली मंदिरात मंगळवार, १९ ऑगस्ट आणि बुधवार, २० ऑगस्ट रोजी दोन दिवसीय वार्षिक हरिनाम सप्ताह सोहळा साजरा होणार आहे.
मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता या सोहळ्याला प्रारंभ होईल. यावेळी इन्सुली, वेत्ये, सोनुर्ली, रोणापाल, मडूरे, आणि निगुडे या गावातील ग्रामस्थ आपली भजने सादर करतील. बुधवारी दुपारी १२ वाजल्यानंतर दिंडी आणि आरतीने या हरिनाम सप्ताहाची सांगता होईल.
या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी श्री देवी माऊली देवस्थान समिती, निगुडे, मानकरी आणि सर्व ग्रामस्थांनी भाविकांना आवाहन केले आहे.




