चिपळूण,दि.१६: येथील मिरजोळी ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्यदिनाचा ७९वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मंगलप्रसंगी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात आयोजित केलेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभात विद्यमान सरपंच कासमभाई दलवाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपसरपंच सौ. प्रचिती भैरवकर, पोलीस पाटील सौ. नंदिनी पवार, कृषी अधिकारी सौ. नेहा जाधव, ग्रामपंचायत अधिकारी रोहिदास हांगे, तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. याशिवाय, मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकवर्ग, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ या सोहळ्याला उपस्थित होते.
यावेळी देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारले होते आणि उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन देशाप्रती असलेला आदर आणि प्रेम व्यक्त केले.







