दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
दिल्ली,दि.२६: भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे आज निधन झाले आहे.
मनमोहन सिंग यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.