एखादी विद्यार्थी संघटना विद्यार्थी हितासाठी सात दशके कार्यरत असणे कौतुकास्पद – शरद गांगल

0
36

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनातील बाळशास्त्री जांभेकर प्रदर्शनी चे उद्घाटन संपन्न..

सावंतवाडी,दि.२६: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५९ वे कोंकण प्रांत अधिवेशन दि. २७ ते २९ डिसेंबर २०२४ दरम्यान सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगरात संपन्न होत आहे.
या अधिवेशनातील आचार्य बाळशास्त्री जांभेकर प्रदर्शनीचे उद्घाटन ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या हस्ते करण्यात आले.

शिक्षणतज्ञ अच्युत सावंतभोसले, अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य प्रा. डॉ वरदराज बापट, कोंकण प्रांत सहमंत्री आसावरी आवटे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदर्शनी उद्घाटक शरद गांगल म्हणाले की, विद्यार्थी परिषदेचे शिल्पकार प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त यशवंतराव केळकर यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनी विद्यार्थी कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी आहे. आपल्या विविध जिल्ह्यात केलेल्या कामाची मांडणी इतर कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी ठरते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी प्रदर्शनी उभारणीसाठी केलेली मेहनत अभिनंदनीय आहे.
प्रमुख अतिथी अच्युत सावंतभोसले म्हणाले की, अधिवेशन आयोजित करण्याची संधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाली आहे.

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याची मांडणी प्रा. वरदराज बापट यांनी केली.
यावेळी बोलताना प्रा. बापट म्हणाले की, जम्मू काश्मीर च्या लेह पासून नॉर्थ ईस्ट मधील मिझोराम पर्यंत अभाविप चे काम आहे. देशातील सर्व विद्यापीठात, सर्व जिल्ह्यात तालुक्यात आहे. आणि ५५ लाखापेक्षा अधिक सदस्य संख्या असलेली जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे.
या आचार्य बाळशास्त्री जांभेकर प्रदर्शनी प्रदर्शनी मांडण्यात आलेल्या बाबींची माहीती प्रदर्शनी गट प्रमुख आकाश पारधी यांनी मांडली. तर आभार प्रदर्शन अभाविप प्रदेश सहमंत्री आसावरी आवटे यांनी केले.

यावेळी अधिवेशन स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, युवराज लखमराजे भोसले, भगीरथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर, प्रभाकर सावंत, शैलेश पै,आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here