सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालया मार्फत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांची तपासणी मोहीम..

0
66

सिंधुदुर्ग,दि.३१: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्या मार्फत दिनांक ३० व आज ३१ “मे” रोजी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांची तपासणी मोहीम राबविण्यात आली, तसेच नेमून दिलेल्या तिकीट दरापेक्षा जास्त दराने तिकीट आकारणी केले आहे का या बाबत तपासणी करण्यात आली. सदर तपासणी ओरोस,कासार्डे,ओसरगाव टोल नाका येथे करण्यात आली.
दरम्यान एकूण ५५ हुन अधिक वाहनचालकांची तपासणी केली.

यावेळी मोटार वाहन निरीक्षक विनोद भोपाळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक केतन पाटील,अमित पाटील व वाहन चालक एस. व्ही स्वामी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here