Home News दिवाळीनिमित्त ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज’तर्फे भव्य किल्ले स्पर्धा; विजेत्यांना रोख बक्षिसे व...

दिवाळीनिमित्त ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज’तर्फे भव्य किल्ले स्पर्धा; विजेत्यांना रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह

0
1

किल्लेप्रेमींसाठी पर्वणी: २० नोव्हेंबरपर्यंत व्हिडिओ पाठवून स्पर्धेत सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन

सावंतवाडी,दि.०७: दिवाळीच्या मंगल पर्वावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अफाट शौर्याची आणि पराक्रमाची साक्ष देणारी गड-किल्ले निर्मितीची गौरवशाली परंपरा जतन करण्यासाठी ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज’ चॅनेलच्या वतीने यंदाही खुल्या गटासाठी भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवकालीन इतिहास आणि संस्कृतीची नव्या पिढीला ओळख व्हावी, तसेच मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा या हेतूने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा उत्साहात होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी ५०० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकृतींना आकर्षक रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी ५,००० रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ३,००० रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकासाठी २,००० रुपये व सन्मानचिन्ह तसेच तीन स्पर्धकांना प्रत्येकी ५०० रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या किल्लाप्रेमींनी आपल्या तयार केलेल्या किल्ल्याचा परिपूर्ण व्हिडिओ आणि गुगल पे द्वारे भरलेल्या प्रवेश शुल्काची पावती २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत ९४२०११०११७ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवणे आवश्यक आहे. तरी या ऐतिहासिक उपक्रमात सर्व शिवप्रेमी व किल्लाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here