Home News सावंतवाडीत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उदया रंगणार ‘खेळ पैठणीचा’….

सावंतवाडीत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उदया रंगणार ‘खेळ पैठणीचा’….

0
1

महिलांसाठी एक ग्रॅम सोन्याचे दागिने व मानाची पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी…

​सावंतवाडी,दि.२४: येथील श्री औदुंबर स्वामी मंदिर उत्सव समितीच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेच्या औचित्यावर महिलांसाठी भव्य ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा रंगतदार सोहळा उद्या, रविवार दिनांक ऑक्टोबरला सायंकाळी ठीक ६ वाजता सावंतवाडी येथील श्री औदुंबर स्वामी मंदिर परिसरात उत्साहात पार पडणार आहे.
​सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि मनोरंजनासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विजेत्यांसाठी आकर्षक आणि मानाची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महिलेस मानाची पैठणी साडी, तर द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी आकर्षक सिल्क साडी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ​याशिवाय कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या विविध मनोरंजक खेळांमध्ये सहभागी होऊन महिलांना पैठणीसह १ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि पारंपरिक नथ जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे, मोबाईलवर सर्वाधिक स्टेटस संख्या दाखवणाऱ्या भाग्यवान महिलेसाठी खास १ ग्रॅम सोन्याचा हार बक्षीस म्हणून दिला जाणार आहे. ​सावंतवाडी शहर व परिसरातील महिलांनी या मनोरंजक कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळांचा आनंद घ्यावा आणि भरघोस बक्षिसे जिंकावीत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी भुवन नाईक (९६०७२९३५८८) किंवा आनंद काष्टे (९४२१०१०५०९) यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत-जास्त महिलांनी या खेळात भाग घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने अमोल टेंबकर यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here