सावंतवाडी,दि.१७ : तालुक्यातील कोलगाव येथे २० ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीर, तसेच मोफत औषधे उपलब्ध करण्यात येणार आहे. मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडी व अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, धारगळ – गोवा यांचे संयुक्त विद्यमाने कोलगाव विकास सोसायटी हॉल, कोलगाव, तालुका सावंतवाडी येथे
या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती मल्ल सम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख, सचिव ललित हरमलकर, खजिनदार गौरव कुडाळकर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकामार्फत दिली.
दरम्यान आरोग्य शिबिरामधील उपलब्ध सेवा:
१. हृदयरोग
२. उच्च रक्तदाब
३. एलर्जी व दमा श्वसन विकार
४. अन्य जुनाट विकार
५. त्वचा विकार
६. लिव्हर व किडनी विकार
७. हाडांचे व सांध्यांचे आजार
८. पॅरॅलिसिस
९. वात विकार
१०. मुळव्याध
११. मधुमेह
१२. थायरॉईड
१३. बालरोग
१४. स्त्री रोग
शिबिरात मोफत औषधे उपलब्ध करून दिली जातील.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
दशरथ – 94053 99156
दादू – 9145253025
वेळ – दिनांक २0 ऑक्टोबर सकाळी ९:३० ते दुपारी ०१:३० वाजेपर्यंत
स्थळ – कोलगाव विकास सोसायटी हॉल, कोलगाव, सावंतवाडी