आरोंदा गावातील ग्रामस्थांच्या वतीने श्री देवी सातेरी भद्रकाली मंदिर परिसरात शिवकालीन वस्तूंच्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन..

0
46

सावंतवाडी, दि.०८: अखंड हिंदुस्थानातील हा एक सुवर्ण क्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. हे वर्ष राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष असून संपूर्ण महाराष्ट्रात विविध उपक्रमाच्या माध्यमातून हे राज्याभिषेक वर्ष साजरा केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपला कट्टा संस्था व शिवशंभू विचार मंच यांच्या सहयोगाने श्रीदेवी सातेरी भद्रकाली वर्धापन दिनाचे औचित्य साधून आरोंदा गावातील समस्त ग्रामस्थांच्या वतीने मंदिर परिसरात शिवकालीन वस्तूंच्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन दिनांक १० मे रोजी सकाळी ९.०० ते सायं ८.०० वाजे पर्यंत करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात शिवकालीन शस्त्र, नाणी, मोडी लिपीतील पत्र, लेखन साहित्य, गडकिल्ल्यांची छायाचित्र, भारतीय पुरातन बैठे खेळ, निवडक टपाल तिकिटे हे सर्व पाहायला मिळणार आहे. शस्त्रास्त शास्त्र पारंगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा एक भाग म्हणून त्या काळातील शस्त्रपरंपरा मर्दानी खेळांच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. नव्या पिढीला शिवचरित्राची ओळख विविध संदर्भ साधना मार्फत देण्यात येणार आहे. सर्वांनी या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन आरोंदा गावातील समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here