सावंतवाडी,दि.०५: आज भारतीय जनता पार्टी सांगेली आणि युवा मोर्चा सांगेली यांच्यावतीने सांगेली गावात भव्य बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीची सुरवात जिल्ह्यातील जागृत देवस्थान सांगेली गावचे ग्रामदैवत श्री गिरोबा मंदिर येथून करण्यात आली.
यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, आंबोली मंडळ तालुका अध्यक्ष रविंद्र मडगावकर, पंढरी राऊळ,सरपंच लवू भिंगारे,उपसरपंच संतोष नार्वेकर, वामन नार्वेकर, आनंद राऊळ,बाबुराव कविटकर, पंढरीनाथ पुनाजी राऊळ,गुरुप्रसाद राऊळ, सागर सांगेलकर, नारायण राऊळ,उमेश राऊळ,न्हानू राऊळ,अमित राऊळ,प्रकाश रेडीज, दिलीप नार्वेकर, युवा कार्यकर्ते महेश रेमुळकर,सुहास राऊळ, मनोज राऊळ,पंढरी सावंत, रुपेश सावंत, महेंद्र रेमुळकर,सचिन नार्वेकर,अमित राऊळ,गजा राऊळ,सुशांत राऊळ, आदी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.