..या स्पर्धेचा महाविजेता संघ कोजबकर वॉरियर्स… तर उपविजेता फ्रेंड्स फोरेव्हर्स
सावंतवाडी,दि.१३: तालुक्यातील शिरशिंगे येथे ११ व १२ मे रोजी लेजेंड प्रीमियर लीग २०२४ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे शनिवारी ११ मे रोजी गावचे माजी सरपंच नारायण राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शिरशिंगे गावचे सरपंच दीपक राऊळ,पोलीस पाटील गणू राऊळ,तलाठी सर्जेराव चव्हाण, माजी उपसरपंच पांडुरंग राऊळ,भाऊ राऊळ, प्रशांत देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान या दोन दिवसाच्या स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचा अंतिम सामना कोजबकर वॉरियर्स व फ्रेंड्स फोरेव्हर यांच्यामध्ये चुरशीचा झाला.
दरम्यान प्रशांत देसाई यांचा कोजबकर वॉरियर्स हा संघ विजेता तर गोकुळदास मेस्त्री यांचा फ्रेंड्स फोरेव्हर हा संघ उपयोजिता ठरला.
तर दीपक परब यांच्या आर.डी (R D) लेजेंड संघाला शिस्तबद्द संघ म्हणून पुरस्कार देण्यात आला.
या स्पर्धेत मालिकावीर अजित राऊळ,उत्कृष्ट फलंदाज बबलू राऊळ,उत्कृष्ट गोलंदाज आनंद धोंड,ऑरेंज कॅप – बबलू राऊळ,पर्पल कॅप – तुषार नाईक,सर्वाधिक षटकार अजित राऊळ,ओल्ड ईज गोल्ड न्हानू राऊळ,गेम चेंजर चषक किरण राऊळ,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कृष्णा राऊळ,तर अंतिम सामना सामनावीर बापू जाधव ठरला.
या स्पर्धेसाठी मुंबई पुणे कोल्हापूर गोवा गुजरात अशा विविध ठिकाणावरून गावातील खेळाडू दोन दिवसाच्या सुट्ट्या टाकून या उपस्थित राहिले होते.
दोन दिवसाची ही स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडली.