माजी नगराध्यक्ष संजू परब यांची पत्रकार परिषदेत माहिती
सावंतवाडी,दि.२९ : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकीचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना सावंतवाडी शहरातून तब्बल ८० टक्केपेक्षा अधिक मतदान होईल. त्यांना मोठं मताधिक्य शहरातून दिलं जाईल. यासाठी त्यांच्या प्रचारार्थ येत्या २ मे ला सायंकाळी ५ वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आलले आहे. यात सुमारे एक हजाराहून अधिक महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.
यावेळी संजू परब पुढे म्हणाले, सद्या लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे चालू आहेत. महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघाचे उमेदवार आहेत. ते नक्कीच अडीच लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने ही निवडणूक जिंकतील.
सावंतवाडी शहरातून तब्बल ८० टक्के पेक्षा अधिक मतदान त्यांना होईल.
येत्या २ मेला सायंकाळी ५ वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे. शहरातून ही रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व महायुतीचे इतर नेते, पदाधिकारी देखील सहभागी असतील. प्रचार कार्यालयाकडून या रॅलीचा शुभारंभ होईल. किमान १ हजार पेक्षा अधिक महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विकासाची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. महायुती सरकारनं शहरात मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. त्यामुळे शहरवासीय महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यामागे उभे राहतील अशी माहिती संजू परब यांनी दिली. याप्रसंगी भाजपचे सावंतवाडी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, चराठा उपसरपंच अमित परब आदी उपस्थित होते.