नारायण राणे यांची शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यावर टीका
चिपळूण,दि.३०: राज्याच्या मुख्य सचिवांसोबत बैठक घेऊन केंद्राकडून निधी उपलब्ध करून चिपळूणचा रेड व ब्लू लाईनचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवणार असल्याचे आश्वासन देशाचे उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांनी सोमवारी सायंकाळी चिपळूणमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यामध्ये बोलताना चिपळूणवासी यांना दिले.
लोकसभेची ही निवडणूक देशाच्या प्रगतीसाठी, विकसित भारतासाठी महत्त्वाची आहे. देशातील महिला, युवा, शेतकरी गरीब माणूस या सर्वांच्या उत्कर्षासाठी ही निवडणूक असून देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना विराजमान करण्याची जनतेसाठी गरज असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी करताना भाजपचे ३०३ खासदार आहेत. तर आता ४०० पारची मोदींनी घोषणा केली आहे. तर दुसरीकडे ‘ अब की बार मोदी तडीपार’ म्हणणाऱ्या यांची कुवत काय? मोदी यांनी मनात आणले तर यांना २४ तासांत तडीपार करू शकतात, अशी घणाघाती टीका राणेंनी ठाकरेंवर केली.
चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राबाहेरील मैदानावर सोमवारी सायंकाळी महायुतीची जाहीर प्रचार सभा झाली. यावेळी नारायण राणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोरोना काळात मोदींनी देशात लस निर्माण करून लोकांचे जीव वाचवले. परदेशातदेखील लस पाठवली. कोरोनामुळे कारखाने बंद पडले. देशातील जनतेची उपासमार होऊ नये, ८० कोटी जनतेला मोफत धान्य दिले. आजही सुरू आहे, आणखी पाच वर्षे सुरू राहील. तेव्हा हे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. मात्र, दोन दिवस फक्त मंत्रालयात गेले. उद्धवने काय केले. मोदींनी राज्यात औषधे पाठवली. त्यात १५ टक्के कमिशन चां घोळ झाला अशी टीका ना .राणे यांनी आपल्या भाषणात बोलताना केली.
मोदींनी दहा वर्षात आत्मनिर्भर विकसित भारत बनवला
ते पुढे म्हणाले की, मोदींनी देशातील जनतेला विविध ५४ योजना दिल्या. आपल्या खात्यातून आपण लोकांना ३५ ते ९० टक्के सबसिडी दिली. मी खात्याचा पदभार स्वीकारला तेंव्हा केवळ १३ टक्के महिला उद्योजक होत्या. आता २९ टक्के महिला उद्योजक बनल्या आहेत. मोदीजींनी अन्नधान्य, पाणी, घरे दिली. राहुलजी कॉग्रेसने ६५ वर्षात ८० वेळा घटना दुरुस्ती केली. मोदी जाती, धर्मावर बोलत नाही. ते महिला, शेतकरी, युवा, गरीबमाणूस यांच्याबद्दल बोलतात. दहा वर्षात मोदींनी आत्मनिर्भर, विकसित भारत बनवला पण उद्धव शिव्या देतो. तो कर्तृत्वशून्य माणूस आहे. याने मुखमंत्री पदासाठी टूनकण उडी मारली. त्याला म्हणावे देशाच्या विकासावर बोल. तो मोदींवर बोलतो, मोदी झाले की मग शिंदे वर येतो. तो भ्रष्ट माणस आहे. काँग्रेसकडे गेला. कारण काँग्रेस भ्रष्टाचारी आहे. मोदींनी मनात आणले तर २४ तासात याला याला तडीपार करतील, असे ना. राणे यांनी सांगून विरोधकांवर जोरदार टीकेचे आसूड ओढले.
* बैठक घेऊ व गरज भासल्यास केंद्राकडून निधी उपलब्ध करून देऊ व हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन राणेंनी यावेळी दिले.
*मंत्रिमंडळ स्थान मिळण्यासाठी मला विजयी करा, राणेंचे आवाहन*
मोदीजींना आपल्यासाठी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवले पाहिजे. देशाच्या विकासासाठी मोदीजी पंतप्रधान होणारच. परंतु त्यांच्या मंत्रीमंडळात कोकणला स्थान मिळण्यासाठी कमळासमोरील बटन दाबून मला संधी द्या, असे आवाहन ना. राणे यांनी केले.
यावेळी रिपाई जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, मनसेचे संतोष नलावडे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार सदानंद चव्हाण, आमदार शेखर निकम, उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी मनोगत व्यक्त करताना मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी, देशाचा विकास करण्यासाठी नारायण राणे यांना निवडेन द्या, असे आवाहन केले. प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा प्रभारी अतुल कालसेकर, तालुका संघटक वसंत ताम्हणकर, रिपाई राज्य कार्यकारिणी सदस्य दादासाहेब मर्चेंडे, रिपाई जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस जयंत खाताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, भाजप शहर संघटक राम शिंदे, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई चव्हाण, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेखा खेराडे, मनसेचे संतोष नलावडे, ब शिवसेना तालुका प्रमुख बापू आयरे, माजी सभापती पूजा निकम, प्रशांत मोहिते, मा.जि.प. सदस्या दिशा दाभोळकर, सेनेच्या सीमा चव्हाण, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष अदिती देशपांडे, महिला तालुकाध्यक्ष जागृती शिंदे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, रिपाई सचिव उमेश सकपाळ, जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले, युवासेना तालुकाप्रमुख निहार कोवळे, माजी नगरसेवक आशिष खातू, विजय चितळे, राष्ट्रवादीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, माजी.पं.सं. सदस्य बाबू साळवी, युवक अध्यक्ष निलेश कदम, अल्पसंख्यांक अध्यक्ष समीर काझी, युवा मोर्चाचे शुभम पिसे, आदी मान्यवर उपस्थित होते. सभेच्या सुरवातीला मॅजिकलं इव्हेंट ग्रुप कणकवलीचे पथनाट्य, विलास पांचाळ ग्रुपचा जादूगार राजेश हे मनोरंजनाचे कार्यक्रम सादर झाले. यातून भाजपाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात आला. भाजप जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे यांनी सूत्रसंचालन केले तर युवा मोर्चाचे मंदार कदम यांनी आभार मानले.