नेमळ्यातील ग्रामस्थांचा विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश..
सावंतवाडी,दि.२९: येथील मतदार संघात गेल्या वर्षभरात युवा उद्योजक विशाल परब यांनी आपल्या कार्यपद्धतीने युवा वर्गांवर आपली छाप सोडली आहे.
त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काल रविवारी नेमळे गावातील ५० हून अधिक उबाठा शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
त्यांनी यावेळी बोलताना विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आम्ही विकासाला महत्त्व देतो त्यामुळे अनेकजण आज भाजपात प्रवेश करत आहेत, येणाऱ्या काळात भाजपाच्या माध्यमातून विकासाची गंगा गावागावापर्यंत पोहोचवली जाणार आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत मोदींना साथ देण्यासाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी नेमळे येथे केले.
नेमळे वेंगुर्लेकरवाडी येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व नेमळे गावचे माजी सरपंच विनोद राऊळ,ॲड.अनिल निरवडेकर, यांच्या माध्यमातून विशाल परब यांच्या उपस्थितीत प्रथमेश गुडेकर, शांताराम गुडेकर, शांती गुडेकर, किरण गुडेकर, शांताराम वेंगुर्लेकर, वैशाली कानसे, गौरी कानसे आदींसह तब्बल ५० ठाकरे सैनिकांनी मशालीची साथ सोडत भारतीय जनता पार्टीचे कमळ हाती घेतले.
यावेळी व्यासपीठावर ॲड. अनिल निरवडेकर गाव अध्यक्ष मनोहर राऊळ आदी उपस्थित होते.