सावंतवाडी,दि.०२: येथील राष्ट्रवादी तालुका व युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ११ नोव्हेंबरला खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत खुल्या गटासाठी १११११/- तर बाल गटासाठी ५५५५,/- अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत. अशी माहिती तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आणि युवक शहराध्यक्ष नईम मेमन यांनी दिली.
यावेळी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर तालुका सरचिटणीस हीदायतुल्ला खान,अंझला नाईक,कृपेश राठोड,अमित सावंत,रोहीत गावडे,आवेझ खान आदी उपस्थित होते.
ही स्पर्धा ११ तारखेला रात्री साडे आठ वाजता येथील श्रीराम वाचन मंदिर समोर मोती तलावाच्या काठावर होणार आहे या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा द्वितीय पारितोषिक सात हजार ७७७ तर तृतीय पारितोषिक पाच हजार ५५५ असे ठेवण्यात आले आहे.
तर बालगटासाठी प्रथम पारितोषिक ५,५५५, द्वितीय पारितोषिक २,२२२ तर उत्तेजनार्थ म्हणून लहान मुलांच्या तीन गटांना १,१११ रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही या स्पर्धेचे औचित्य साधून सामाजिक राजकीय शैक्षणिक सेवा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी भाग घेवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे देवेंद्र टेमकर 9403044019 कृपेश राठोड 7760208014 ,अंझला नाईक 7249770838 या नंबरशी संपर्क साधावा तसेच या स्पर्धेसाठी जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व राष्ट्रवादी युवक राष्ट्रवादी मेमन यांच्या वतीने करण्यात येत आहे.