सिंधुदुर्ग,दि.०२: मराठ्यांचे आक्रमक नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड.सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या उपोषणाला आमदार वैभव नाईक यांच्यासह, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत,सुशांत नाईक, बाळा गावडे,पुंडलिक दळवी
यांच्यासह बहुसंख्य मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी उपस्थित राहून उपोषणला पाठींबा दिला.