सावंतवाडी,दि.१४: शहरातील बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यां समवेत काही विद्यार्थीही सहभागी झाले होते.
यावेळी सत्ताधारांविरोधात घोषणाबाजी करत एसटी बस स्थानक परिसरात निदर्शने करण्यात आली व प्रवासी बस रोखण्यात आल्या दरम्यान आगार प्रमुखांनी भेट दिल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर एसटी बस सोडण्यात आल्या.
यावेळी अधिकाऱ्यांना पंधरा दिवसाचे अल्टीमेटम देण्यात आले असुन जर पंधरा दिवसात बस स्थानकाची परिस्थिती सुधारली नाही तर पुन्हा स्थानकामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे जिल्हा उपाध्यक्ष असिफ शेख वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, समीर सातार्डेकर, काशिनाथ दुभाशी गौरी गावडे भाऊ तीस फर्नांडिस संतोष जोईल इफ्तेकर राजगुरू, दर्शना बाबर देसाई आशिष कदम सावली पाटकर, युक्ता रासम, संतोषी वर्देकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.