सावंतवाडी,दि.१५: तालुक्यातील कारीवडे- पेडवेवाडी येथे चालकाचा ताबा सुटल्याने सुमो पलटी होऊन अपघात झाला. यात प्रवास करणाऱ्या बेळगाव-खानापुर येथील आठ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.सुदैवाने कोणालाही मोठी इजा झाली नाही. ही घटना आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास येथील धोकादायक वळणार घडली.
अचानक समोरून कुत्र्याची झुंड आल्यामुळे चालकाने अर्जंट ब्रेक मारला असता गाडी थेट पलटी झाली. संबंधित कुटुंब सावंतवाडी येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आले होते.
गाडी रस्ता सोडून पलटी झाली सुदैवाने अपघातात कोणत्याही जीवितहानी झाली नाही.