प्रेरणा भोसलेने कराटे स्पर्धेत मिळवले ब्रॉंझ पदक;जिल्ह्यात तिसरा क्रमांक..

0
125

पत्रकार भोसले यांच्या कन्येची उल्लेखनीय कामगिरी

सिंधुदुर्ग, दि.१४: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पुन्हा एकदा खेमराज बांदाच्या कु.प्रेरणा जय भोसले हिने जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त करत ब्रॉंझ मेडल प्राप्त केलं.
सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल येथे कराटे स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.यामध्ये जिल्ह्यातील विविध शाळातील कराटे पटू सहभागी झाले होते.खेमराज बांदाच्या प्रेरणा भोसले हिने घवघवीत यश संपादन केलं आहे.किरण देसाई यांचं मोलाचं मार्गदर्शन तिला लाभले.मागच्या आठवड्यात झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत तीने सुवर्णपदक पटकविले होते.
तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here