सावंतवाडी,दि .१३: शहरातील बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी पाहणी करत तेथील आगारप्रमुखांना या व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याबाबत निवेदन दिले होते. परंतु जवळपास एक महिना होऊन देखील कुठल्याही प्रकारचा बदल तेथील दुरावस्थेमध्ये झालेल्या नाही, त्यामुळे त्याच वेळी दिलेल्या इशाऱ्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडी व समस्त सावंतवाडीकर नागरिकांच्या वतीने सावंतवाडी बस स्थानकावर उद्या शुक्रवार १४ जुलै रोजी हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाला सकाळी ठीक ११ वाजता सुरुवात होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांनी केले आहे.