वरेनियम क्लाउड कंपनीमध्ये स्थानिक तरुण तरुणींना प्राधान्य द्या.. मनसेची मागणी

0
73

सावंतवाडी,दि .१४: येथील वरेनियम क्लाउड कंपनीतर्फे मुलां मुलींसाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखती मध्ये जास्तीत जास्त स्थानिक सुशिक्षित बेरोजगार असलेल्या तरुण तरुणीना संधी दिली जावी. मुलाखत झाल्यानंतर तातडीने त्यांना नोकरीत हजर करून घेण्यात यावे अशी मागणी सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कंपनीचे अधिकारी सतीश पाटणकर यांच्याकडे करण्यात आली यावेळी मनसे पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेतली.
सावंतवाडी मनसेतर्फे सोमवारी वरेनीयम क्लाउड कंपनीच्या कार्यालयाला भेट देण्यात आली. यावेळी पदाधिकारी यांनी कंपनीचे अधिकारी सतीश पाटणकर यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थीसेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार,माजी उपजिल्हाध्यक्ष तथा जनहित विधि जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, माजी उपशहर अध्यक्ष प्रवीण गवस तसेच पदाधिकारी उपस्थित होते. कंपनीतर्फे अलीकडे बऱ्याच मुलां मुलीच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. काहींना त्यांची निवड करण्यात आल्याचे सांगून ऑफर लेटर ही देण्यात आली मात्र त्यांना प्रत्यक्ष अद्याप सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही असे पदाधिकारी राजू कासकर यांनी सांगत कंपनीच्या डेटा इंट्री ऑपरेटर तसेच कॉलिंग सुविधेसाठी लागणाऱ्या पदाकरिता या मुलाखती सुरु आहेत त्यामध्ये स्थानिक मुलां मुलींना जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिकांनाच या नोकऱ्यांचा लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी ऍड अनिल केसरकर यांनी केली. काही विद्यार्थ्यांना जॉबसाठी निवडण्यात आल्याचे फोन वरून सांगण्यात आले परंतु त्यांना जॉबवर हजर करून घेण्यात आले नाही. काही मुलांनी तर नवीन जॉब मिळाल्यामुळे जुन्या जॉबचा राजीनामा दिला त्यामुळे ते दोन्ही बाजूनी अडचणीत सापडल्या आहेत त्यांचा विचार कंपनीने अगोदर करावा अशी मागणी उपशहर अध्यक्ष प्रवीण गवस यांनी करीत आक्रमक भूमिका घेतली. मुलाखत घेतलेल्या उमेदवारांना तातडीने जॉब दया असे सांगत लक्ष वेधले. बहुतांशी उमेदवारांनी याबाबत मनसेकडे तक्रारी केल्या असून याची दखल कंपनीकडून घेतली जावी त्याप्रमाणे जलदगतीने कार्यवाही करावी असा ईशारा आशिष सुभेदार यांनी दिला . त्यावर अधिकारी पाटणकर यांनी मुलाखत घेतलेल्या उमेदवारांना टप्प्याटप्प्याने जॉबवर बोलाविण्यात येणार आहे. कंपनीमार्फत अदयाप ही मुलाखत प्रक्रिया सुरु असून ती थांबविण्यात आलेली नाही. ज्या उमेदवारांना ऑफर लेटर दिले निवड करण्यात आली त्याच्या पहिल्या बॅचला नोकरीत हजर करून घेण्याची प्रक्रिया कंपनीने सुरु केली आहे. कंपनीला लागणारे उमेदवार हे स्थानिकच निवडण्यात येणार असून त्यासाठी कंपनी विशेष लक्ष देत आहे. मुलाखत झालेल्यायांना लवकरच सेवेत सामावून घेतले जाईल असे आश्वासन मनसे पदाधिकारी यांना दिले.यावेळी पदाधिकारी यांनी मुलाखत प्रक्रिया बाबत तसेच मुलांना सेवेत हजर करून न घेण्याबाबत अधिकारी यांना जाब विचारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here