तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला क्यू आर कोड (QR CODE) उपलब्ध करून देणार..सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक सिंधुदुर्गचा स्तुत्य उपक्रम..

0
159

कारिवडे ग्रामपंचायत सरपंच सौ आरती माळकर यांच्या कडे क्यू आर कोड सुपूर्त करताना.. संचालक महेश सारंग

सावंतवाडी,दि.१४: तालुक्यात एकूण ६३ ग्रामपंचायत असून प्रत्येक ग्रामपंचायतला सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेकडुन QR code( क्यु आर कोड) उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.यासाठी आवश्यक कागद पत्रांचा नमुना संच ग्रामपंचायतमध्ये पोहोचविण्यात आलेला आहे.
यामुळे ग्रामस्थांना नळपाणी,तसेच ग्रामनीधी खात्यांमध्ये भरणा करावयाच्या रक्कम आता थेट Q R code( क्यु आर कोड) मार्फत ग्रा.प.खात्यामध्ये वर्ग करता येईल,यामुळे वेळ तर वाचणार आहेच,परंतु व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता येउन सर्वांसाठी व्यवहार सोयीचे होतील.
आजतागायत सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव,कोलगाव,माडखोल,सरमळे,ओटवणे,सोनुर्ली,मळे वाड कोंडुरे,कारिवडे इ.ग्रामपंचायतींना Q R code( क्यु आर कोड) बँकेने उपलब्ध करुन दिलेले आहेत.उर्वरित ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रासह नजिकच्या सिंधुदूर्ग बँकेच्या शाखेत संपर्क साधुनQ R code( क्यु आर कोड) मागणी करण्याचे आवाहन सिंधुदूर्ग जिल्हा बँकेचे संचालक महोदय,श्री.महेशजी सारंग यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here