सावंतवाडी,दि.१४: स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्ती निमित्त देशभरात अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे.ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून अमृत महोत्सव निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शनिवारी सकाळी ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यालयात झेंडावंदन करण्यात आले.यानंतर राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड केंद्रशाळा नंबर एकच्या पटांगणावर उभारलेल्या शिला फलकाचे पूजन करून शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.
यानंतर विद्यार्थी,शिक्षक,पालक,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ,अंगणवाडी सेविका,आशा सीआरपी यांनी मळेवाड शाळा नंबर १ ते मळेवाड जकातनाका अशी प्रभात फेरी काढली.
यावेळी मळेवाड जकातनाका येथे ७५ दिवे पेटवून पंचप्राण शपथ घेण्यात आली.तसेच गावातील माजी सैनिकांचा सन्मान सत्कार करण्यात आला.मुलांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या केलेल्या वेशभूषेमुळे आणखीनच रंगत आली.अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.यां कार्यक्रम वेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना उपसरपंच हेमंत मराठे यांनी अमृत महोत्सवनिमित्त आयोजित कार्यक्रम साजरा होत असंताना गावातील ग्रामस्थ,विद्यार्थी,सर्व कर्मचारी यां सहकार्य करुन यशस्वी केल्याबद्दल आभार मानले.तसेच हर घर तिरंगा मोहिमेतही सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.यावेळी सरपंच मिलन पार्सेकर,ग्रा प सदस्य अमोल नाईक, स्नेहल मुळीक,गिरिजा मुळीक, सानिका शेवडे,मधुकर जाधव, ग्रामसेवक सोमा राऊळ,पोलीस पाटील दिगंबर मसुरकर,तलाठी अनुजा भास्कर,केंद्र प्रमुख म ल देसाई,महेश कुंभार,नाना कुंभार, बाळा शिरसाट,शिक्षक,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,बचत गट सी.आर पी,विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ मोठ्या सख्येने उपस्थित होते.