माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण…
सावंतवाडी,दि.१४: तालुक्यातील कवठणी ग्रामपंचायत येथे मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये सकाळी माजी सैनिक उल्हास मुठिये यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर १५ व्या वित्त आयोग मधून अंगणवाडीतील मुलांना गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी माजी महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गांवकर,सरपंच अजित कवठणकर, उपसरपंच सोनम कवठणकर, ग्रामपंचायत सदस्य अमित कवठणकर, रेश्मी कवठणकर, विजया कवठणकर, श्रद्धा कवठणकर, अंगणवाडी सेविका आरती कोरगावकर, मुख्याध्यापक लाड, ग्रामसेवक विश्वनाथ लातिये, माजी सैनिक उल्हास मुठिये, तसेच कवठणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.