मनसेच्या शिष्टाईनंतर अखेर कालव्याचे काम सुरू..

0
158

शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला तसेच पूर्णतः नुकसान भरपाई देण्याचे लेखी दिले आश्वासन.. आशिष सुभेदार यांची माहिती

सावंतवाडी,दि.०१: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या यशस्वी शिष्टाईनंतर अखेर निगुडे आसवेकर वाडीच्या बाजूला सुरू असलेले कालव्याचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहमती दर्शवली. कंपनीचे ठेकेदार व पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच शेतकऱ्यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला तसेच पूर्णतः नुकसान भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिले त्यानंतर या वादावर तोडगा पडला.
यासाठी मनसेचे पदाधिकारी श्री सुनील आसवेकर यांनी शेतकरी वं कंपनीचे अधिकारी यांच्यात मध्यस्थी केली. काही दिवसांपूर्वी निगुडे येथील आसवेकर वाडीच्या बाजूला सुरू असलेले कालव्याचे काम मनसे तसेच शेतकरी ग्रामस्थांनी रोखले होते. स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांना योग्य तो मोबदला न देता तसेच कोणतीही पूर्वकल्पना न देता शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये खोदकाम सुरू करण्यात आले होते सदर बाब लक्षात येतात मनसे सहित ग्रामस्थांच्या मदतीने ते काम रोखण्यात आले होते.
याप्रशनी निगुडे येथे मंगळवारी शेतकरी तसेच कंपनीचे अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊन पूर्णतः नुकसान भरपाई देण्याचे अधिकारी यांनी कबूल केल्यानंतर ग्रामस्थांनी काम करण्यास परवानगी दिली. यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने यशस्वीरित्या मध्यस्थी केली. अशी माहिती म.न.वि.से जिल्हाअध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिली.
निगुडे गावातील शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत तिलारी कालव्याच्या अधिकारी यांनाही पाचारन करण्यात आले.

यावेळी राजेश मयेकर, योगेश केणी ,गाजानन सावंत,दिनकर गावडे, तिलारी कालव्याचा वंदना नाईक,मदु शेगडे,दयानंद बादेकर,नाना खडपकर,बबन सावंत,अनिल जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here