पैशाच्या वादातून खून
सावंतवाडी, दि.३१:आर्थिक देवघेवीच्या वादानंतर पंढरपूर येथील मुकादम सुशांत खिल्लारे याचे अपहरण करून कराड येथे घातपात करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह नष्ट करण्यासाठी आंबोली घाटातील दरीत टाकण्याचा प्लान रचण्यात आला. परंतू प्लास्टिक पिशवीत असलेला मृतदेह खाली टाकताना तोल जावून भाऊसो माने हा घाटात कोसळला, अशी कबुली या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला संशयित तुषार पवार यांनी सावंतवाडी पोलिसांना दिली आहे. त्यानुसार या प्रकरणाचा तपास करीत आहोत, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. हा सर्व प्रकार आर्थिक देवघेवीच्या वादातून झाला.पंढरपूर येथे मुकादम म्हणून काम करणा-या सुशांत खिल्लारे यांच्याकडून वीट भट्टीवर काम करण्यासाठी कामगार मागण्यात आले होते. त्यासाठी त्याला तीन लाख रूपये देण्यात आले होते. परंतु पैसे घेतल्यानंतर खिल्लारे याने कामगार दिले नाही. तसेच पैसे परत करण्यास नकार दिल्यामुळे प्लान करून त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर…
देवघवीवरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारी व त्यानंतर खून असे झाल्यामुळे नाट्यमय रीत्या आंबोली घाटामध्ये मिळालेले दोन मृतदेह यामुळे या दुहेरी हत्याकांडाला नाट्यमय वळण मिळाले आहे.
कराड येथील दोन मित्रांमध्ये वीट कामगारांचा पुरवठा करण्यावरून आर्थिक व्यवहार झाले जी रक्कम काही लाखांमध्ये होती ही रक्कम भाऊसो अरुण माने वय ३० राहणार कराड याने सुशांत खिल्लारे व २८ याला दिले होते, परंतु वर्षभर तो पैसे व सांगितलेले कामही करत नसल्याने भाऊसो यांनी आपला मित्र तुषार पवार यांच्यासोबत सुशांत खिल्लारे याला कराड येथे निर्जन स्थळे बोलावून घेतले व आपल्या व्यवहाराचे काय झाले असे विचारणा केली तसेच त्याला मारहाण केली तुषार पवार वय २८ व भाऊसो माने यांनी सुशांत याला बेदम मारहाण केली यात सुशांत याचा मृत्यू झाला याच परिस्थितीत दोघेही घाबरल्यामुळे त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली घाटण्याचे ठरवले व ते कराडऊन आंबोली घाटात पोहोचले आंबोली घाटातील मुख्य धबधबा पासून सावंतवाडीच्या दिशेने एक किलोमीटर गेल्यानंतर त्यांनी गाडी चालूच ठेवून रात्रीच्या अंधारात म्हणजे आठ वाजताच्या सुमारास मृतदेह खाली फेकण्यासाठी बाहेर काढला व संरक्षक कठड्यावर उभे राहिले सध्या स्थितीत पर्यटन हंगाम कमी असल्यामुळे रस्त्यावर म्हणावे तितकी वाहतूकही नव्हती याचा फायदा घेत त्यांनी मृतदेह फेकण्यासाठी कठड्यावर उभे राहिले परंतु यावेळी नेमका मृतदेह फेकताना सुशांत चा मृतदेह तर खाली फेकला गेलाच परंतु त्याच वेळेस तोल गेल्याने भाऊसो माने सुद्धा दरीमध्ये कोसळला परंतु तुषार मात्र यातून बचावला त्याने स्वतःला सावरले व तो वरच राहिला तुषारने आपला मित्र भाऊसो याला हाका मारल्या परंतु कोणताही उपयोग झाला नाही तुषार याने चालू असलेली गाडी तशीच पुढे पूर्वीचा वस मंदिर येथे आणली व गाडी बंद केली यानंतर तुषार यांनी घडलेला प्रकार भाऊसो याच्या नातेवाईकांना सांगितला त्यांनी लागलीच याबाबत पोलिसांना खबर दिली मंगळवारी दुपारी एक वाजता च्या सुमारास आंबोली पोलिसांना याबाबत कराड पोलिसांकडून खबर देण्यात आल्यानंतर तात्काळ आंबोली पोलीस व आंबोली रेस्क्यू टीम मार्फत घटनास्थळी शोध मोहीम सुरू केली घटनास्थळी शोधत असताना रेस्क्यू टीमला दोन मृतदेह आढळून आले सायंकाळी चार वाजेपर्यंत दोन्ही मृतदेहांना वर काढण्यात आले व शवच्छेदनासाठी सावंतवाडी येथे पाठविण्यात आले आहेत.
यावेळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे ,पोलीस उपनिरीक्षक अमित गोते, आंबोली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, पोलीस कॉन्स्टेबल दीपक नाईक, दत्तात्रय देसाई दीपक शिंदे तसेच आंबोली रेस्क्यू टीमचे मायकल डिसोजा, उत्तम नार्वेकर, हेमंत नार्वेकर, विशाल बांदेकर, संतोष पालेकर, राजू राऊळ ,अजित नार्वेकर आदी उपस्थित होते.



