गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार.. निरीक्षक मेंगडे
सावंतवाडी,दि.३१: शहरात काल घडलेल्या मंगळसुत्र चोरीच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरिक्षक मेंगडे यांची भेट घेतली.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, हा प्रकार सावंतवाडी नगरीसाठी भूषणावह नाही त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी सीसीटिव्ही लावा, कोणी संशयित आढळल्यास तात्काळ त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करा आणि महिला सुरक्षीत राहतील यासाठी उपाययोजना करा, अशी मागणी आज येथे पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांच्याकडे करण्यात आली.
आज साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरिक्षक मेंगडे यांची भेट घेतली. यावेळी माजी उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, माजी नगसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमाकांत वारंग, अफरोझ राजगुरू, रवी जाधव, संतोष तळवणेकर आदी उपस्थित होते.
दरम्यान पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी आम्हीं योग्य रित्या कारवाई करून शहरात वाढलेले गुन्हेगारीचे प्रमाण यावर लवकरात लवकर आळा घालणार, मात्र नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी असेही यावेळी सांगितले.