मळगावमध्ये ५ आणि ६ एप्रिल पासून रंगणार जय भंडारी चषक लीग-२०२५ क्रिकेट स्पर्धा

0
11

सावंतवाडी,दि.०४: मळगावच्या म्हारकाटा मैदानावर ५ आणि ६ एप्रिल रोजी गाव मर्यादित भंडारी चषक लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रुपये १५ हजार (शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब पुरस्कृत) व गणेश प्रसाद पेडणेकर पुरस्कृत आकर्षक चषक आणि द्वितीय पारितोषिक रुपये १० हजार (श्रीम. मनोरामा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट
व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई
संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी आणि युवा उद्योजक प्रसाद नाईक पुरस्कृत ) व महादेव हळदणकर यांच्या स्मरणार्थ पांडुरंग हळदणकर यांच्याकडून आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.
तर मालिकावीर ( समीर परब यांच्याकडून मालिकावीरास आकर्षक ट्रॉफी ), सामनावीर: प्रत्येक सामन्यातील सामनावीरास ज्येष्ठ पत्रकार सचिन रेडकर व सामाजिक कार्यकर्ते शेखर गावकर पुरस्कृत आकर्षक चषक, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज ( कै. प्रविण लक्षण सातार्डेकर यांच्या स्मरणार्थ ) प्रितम दिवाकर सातार्डेकर यांच्याकडून आकर्षक चषक तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उदयोन्मुख खेळाडूसाठी पप्पू कांबळी यांच्याकडून आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
या स्पर्धेविषयीच्या अधिक माहितीसाठी गितेश अमरे – ७६२०७३५६६३ व महेंद्र पेडणेकर : ९०२२६८६९४४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here