गणित ऑलिंपियाडमध्ये २० विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल..
सावंतवाडी,दि.०४: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित ऑलिंपियाड फाउंडेशनने घेतलेल्या नॅशनल गणित ऑलिंपियाड परीक्षेत लक्षणीय यश संपादन केले आहे. परीक्षेला शाळेचे ९६ विद्यार्थी बसले होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष बाब म्हणजे यापैकी २० विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
सुवर्णपदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे – इयत्ता पहिली : त्रिशा अमेय गुडीघर, आरोही किशोर लंबे. इयत्ता दुसरी : मानस विजय परब, सान्वी संतोष पोरे, कनिष्का ख्यामनकेरी, हर्षित अतुल चव्हाण. इयत्ता तिसरी : प्रिश रवी गोलघाटे, अर्णव राहुल शेवाळे, आदित्य परेश धारगळकर, रचित गुरुप्रसाद ठाकूर. इयत्ता सहावी : वेदा प्रवीण राऊळ, ऋषिकेश प्रणय तेली, प्रज्योत तुषार पुराणिक. इयत्ता सातवी : अस्मी सचिन पालकर, प्रथमेश मनीष कानविंदे, आरुष अमोल चव्हाण. इयत्ता आठवी : मंथन अच्युत सावंतभोसले. इयत्ता नववी : विश्वजीत वैभव गायकवाड, खुशल संभाजी सावंत,वेदांत बाळकृष्ण घावरे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक आणि मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.