जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक सावंतवाडी शाळा नं.४ चे सुयश..
सावंतवाडी,दि.१९: सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक सावंतवाडी शाळा नं.४ चे कु. हर्षवर्धन भोसले,कु. वीरा घाडी, कु. पार्थ बोलके,कु. हार्दिक वरक हे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून त्यांनी आपल्या शाळेचे नाव जिल्हास्तरावर झळकवले आहे.
त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.