कोल्हापूर कसबा बावडा येथील शाहू सर्कलचा महाराजा रील स्पर्धेत सावंतवाडीचा साईश गावडे प्रथम

0
51

सावंतवाडी,दि.१७: कोल्हापूर कसबा बावडा येथील शाहू सर्कलचा महाराजा शाहू सर्कल सेवा भावी संस्था विरंजे पाणंद यांनी आयोजित केलेल्या रील स्पर्धेत डी वाय पाटील फिजिओथेरपी काॅलेज चा प्रथम वर्षाचा विद्यार्थी सावंतवाडी बिरोडकर टेंब येथील रहिवासी सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचा मुलगा साईश गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
शाहू सर्कल सेवा भावी संस्था विरंजे पाणंद यांनी गणपती रील स्पर्धा आयोजित केली होती यावेळी डी वाय पाटील फिजिओथेरपी काॅलेज मध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी साईश गावडे यांनी गणपतीचे आगमन चे शुटींग करत अप्रतिम रील तयार केली होती,या स्पर्धेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते.या सर्व स्पर्धकांत साईश गावडे यांनी बनवलेली रील अप्रतिम ठरुन प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.
दरम्यान मंडळाने हजरो भाविकांच्या उपस्थितीत कसबा बावडा येथे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन साईश गावडे याचा गौरव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here