सावंतवाडी,दि.१५: फक्त साडेतीनशे रुपयांची गुंतवणूक करून महिनाकाठी पाच ते सहा हजार रुपये मिळवून देणारा गप्पी माशांची पैदास करणार उपक्रम तरुणांना आणि विशेषतः महिलांना खुणावत आहे.
अगदी कमी जागेत आणि कमी किमती हा प्रकल्प उभारून त्या माध्यमातून रोजगार मिळवता येऊ शकतो याचा आदर्श माडखोल धवडकी येथील तरुण सागर कोळमेकर यांनी तरूणाईला घालून दिला आहे.
नोकरी नाही तर नोकरीसाठी जिल्ह्याबाहेर जावे लागते अशा चिंतेत असलेल्या युवकांना हा प्रकल् मार्गदर्शक ठरणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी हा प्रकल्प राबून स्वावलंबी बनाले असे आवाहन कोळमेकर यांनी केली आहे.
कोणतेही मासे पाळण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण नसताना माडखोल धवडकी येथील सागर कोळमेकर या तरूणाने युट्यूबच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी ७० रुपये किंमत असलेल्या गप्पी माशाच्या पाच जोड्या त्यांनी बाजारातून विकत आणलं आणि घरात असलेले प्लास्टिकचे टप तसेच तुटलेले फ्रिज आदी साहित्य जमा करून त्यात या माशाची त्याने पैदास करण्यास सुरुवात केली.
महिनाभरानंतर या उपक्रमाला यश आले त्यातून त्याला तब्बल पाच ते सहा हजार रुपये फायदा झाला अशाप्रकारे त्याने आपला हा प्रवास गेले अनेक महिने सुरू ठेवला आता त्याच्याकडे माशांचे प्रमाण वाढल्यामुळे त्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे आता त्याने यात काहीसा बदल केला असून उत्पन्नात वाढ करण्याचा निर्णय घेतला. याबाबत त्याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली ते म्हणाले यापूर्वी कोरोनाच्या काळात आपण अंडी उबवणी केंद्र चालू केले होते त्याला चांगले यश प्राप्त आले त्यातून अनेक कोंबड्यांचे उत्पन्न घेतले मात्र मध्यंतरीच्या काळात कोंबड्यांचा आजार आल्यामुळे त्या सर्व कोंबड्या मरण पावल्या त्यात नुकसान झाले.
यावेळी वेगळे काय करता येऊ शकते का असा विचार करून आपण यूट्यूबच्या माध्यमातून माहिती घेतली यावेळी गप्पी माशाचे पैदास हा प्रकल्प राबवण्यास सोयीचा असल्याचे पुढे आले त्यामुळे आपण तसा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार घरात असलेल्या प्लास्टिकचे टप व ही तुटलेले फ्रिज अशी टाकाऊ वस्तु एकत्र करून आपण त्यात मासे सोडले दोन आठवड्यांनी त्या माश्यांनी मोठ्या प्रमाणात पैदास केले त्यातील एक मासा हा १५ हून अधिक अंडी घालत असल्यामुळे त्याचा फायदा झाला एक मासा किमान १२ ते १५ रुपयापर्यंत विकला जातो फक्त जेव्हा अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात त्यावेळी मोठ्या माशांपासून छोट्या माणसांना वाचवणे गरजेचे असते त्यासाठी त्यांना वेगळे आणि सुरक्षित ठेवावे लागते त्यासाठी पाणी बदलणे आणि त्यांना वेगळे करणे ही प्रक्रिया असते अन्यथा त्यानंतर काही किचकट काम असत नाही हा प्रकल्प राबवल्यास घराच्या आसपास निर्माण होते.
सावंतवाडी शहरातील काही शोभिवंत मासे विक्री करणारे विक्रेते स्वतःहून हे मासे खरेदी करतात या माशांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे त्यामुळे आपल्याला कोणताही अधिकचा खर्च करावा लागत नाही दुसरीकडे नियमित शोभिवंत माशांना घालण्यात येणारे खाद्य त्यांना घालता येते त्यामुळे त्याचीही मोठी किंमत नसते त्यामुळे विशेषतः युवक युवतींसह महिला हा उपक्रम राबवू शकतात घरबसल्या उत्पन्न घेऊ शकतात पोल्ट्री व्यवसाय गोट फार्म यासारख्या व्यवसायाला हा जोड व्यवसाय म्हणून याकडे पाहता येऊ शकते त्यासाठी जागाही जास्त लागत नाही त्यामुळे जास्तीत जास्त तरुण व महिलांनी जोडधंदा म्हणून हा उपक्रम राबवण्यात हरकत नाही असे ते म्हणाले याबाबत अधिक माहिती हवी असल्यास आपण मार्गदर्शन करण्यास तयार आवश्यक असल्यास ९०२२६५३७४२ या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.