…अन्यथा नगरपालिकेला घेरावा घालू : माजी नगराध्यक्ष संजू परब

0
29

सावंतवाडी,दि.०३: शहरातील उपरलकर देवस्थान नजदीक रस्त्याच्या कडेला फेकण्यात आलेला कचरा तात्काळ नगरपरिषदेने उचलावा, अन्यथा येत्या दोन दिवसात नगरपरिषदेला घेराव घालू असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

याबाबत श्री परब पुढे म्हणाले की गणेश चतुर्थी तोंडावर आली आहे. शहरात चाकरमानी आता उतरायला सुरुवात झाली आहे, असे असताना शहरातील जागृत देवस्थान उपरलकर यांच्या नजदीक रस्त्याच्या कडेला फेकण्यात आलेला कचरा ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शहरात येण्या – जाण्याच्या दर्शनी वाटेवर अशा प्रकारचा कचरा शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण करणारे आहे. त्यामुळे हा कचरा त्वरित उचलून साफ करावा. तसेच कचरा टाकणाऱ्यांवर तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here