सावंतवाडी,दि.०२ : तालुक्यातील शिरशिंगे या गावात गेले कित्येक दिवस बीएसएनएल ची सेवा विस्कळीत झाली असून “टुजी” सेवा खंडित आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांची सणासुदीच्या कालावधीत मोठी गैरसोय होत आहे.
याबाबत गावचे सरपंच दीपक राऊळ, माजी सरपंच सुरेश शिर्के,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत देसाई,नारायण राऊळ यांनी वेळोवेळी संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांना भेटून याबाबत होणारी गैरसोय दूर करा असे निवेदनही दिले होते. मात्र संबंध खात्यातील अधिकारी चाल – ढकल करत असल्याने ग्रामस्थांचे महिन्याला केलेले रिचार्ज वाया जात आहे. पैसे भरूनही सुविधा उपलब्ध होत नल्याने ग्रामस्थांमधून आणि शेतकरी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.