भाजी विक्रेत्यांनी घेतली माजी नगराध्यक्ष संजू परब यांची भेट..
सावंतवाडी,दि.०२: कोकण वासियांचा जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा सर्वात मोठा सण म्हणजे गणेश चतुर्थी. या काळात आम्हाला बाजारपेठेत बाहेर बसायला मुभा द्या अशी मागणी बाजारपेठेतील महिला पुरुष भाजी विक्रेत्यांनी माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांच्याजवळ केली. संबधित व्यापाऱ्यांनी आज श्री परब यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेत याबाबत विनवणी केली.
सावंतवाडी शहरामध्ये संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या नवीन कॉम्प्लेक्स चे काम सुरू आहे त्यामुळे या मंडई परिसरात बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना पालिका प्रशासनाकडून अन्यत्र इंदिरा गांधी कॉम्प्लेक्स पाठीमागे या महिलांना जागा देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी या महिलांचा म्हणावा तसा व्यवसाय होत नसल्याने. तोंडावर असलेल्या गणेश चतुर्थी काळात तरी आम्हाला पूर्वीप्रमाणे त्यावर बसून भाजी विक्री व्यवसाय करण्यास मुभा मिळावी यासाठी महीला पुरुष भाजी विक्रेत्यांनी एकत्र जमत माजी नगराध्यक्ष श्री परब यांची भेट घेतली.
यावेळी आम्हाला प्रशासनाकडून बाहेर बसल्यास अटकाव केला जात आहे, गणेश चतुर्थी काळात रस्त्यावर बसून व्यवसाय करायला मुभा दिल्यास या व्यवसायातून चतुर्थी काळात आम्हाला चार पैसे मिळतील यासाठी आपण पालिका प्रशासनाचे लक्ष वेधा अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
दरम्यान महिला बाजी विक्रेत्यांची बाजू ऐकून घेत श्री परब यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याशी त्यासंदर्भात फोनवरून चर्चा करत येत्या चार तारिख पासून आपल्याला बाजारपेठेत बसण्यास मुभा देण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित महिलांनी श्री परब यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी शिल्पा नार्वेकर, दीपिका मठकर,
प्रमिला शुगरे,शीतल शेळके, सुचिता नाईक, वैभवी गावडे,गणेश कुडव, अमित मठकर, अनिल मठकर,महेश राऊळ,आनंद मांजरेकर, सागर मठकर, विजय शिरवळकर आदी महिला पुरुष भाजी विक्रेत्ये उपस्थित होते.