संजू परब व जावेद खतीब यांची मागणी
सावंतवाडी,दि.३०: बांदा शहरातील पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या रक्कमेत असलेली तफावत दूर करून सर्वांना समान नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब व भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस तथा बांदा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली.
बाजारपेठेतील पूरग्रस्तांची २०१९ सालची नुकसान भरपाई कित्येक वर्षे महसूलच्या गलथान कारभारामुळे अडकून पडली होती. नुकसानग्रस्तांनी वेळोवेळी तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवूनही ही रक्कम त्यांच्या खात्यात पडत नव्हती शासकीय कागदपत्रे नाचूनही नुकसानग्रस्त हैराण झाले होते दरम्यान भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री परब व युवा मोर्चाचे सरचिटणीस श्री खतीब यांनी यासंदर्भात खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर २१० जणांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यात आली. सदरची रक्कम वर्ग करताना काही जणांच्या रकमेमध्ये तफावत दिसून आली आहे तपावर दूर करून सर्वांना समान रक्कम द्या मागणीसाठी आज त्यांनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयामध्ये धडक देऊन तहसीलदार श्रीधर पाटील यांना जाब विचारला. कित्येक वर्ष मागणी करून मिळालेली रक्कम परिपूर्ण द्या अर्धवट रक्कम देऊन आमच्या जखमेवर मीठ चोळू नका अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.