सावंतवाडीत झाला शानदार शुभारंभ, दिग्गज मान्यवरांची उपस्थिती.
सावंतवाडी,दि.१६ : येथील ‘विकल्प टूर्स अँड विकल्प ग्लोबल एज्युकेशन कन्सल्टन्सी’ ही अतिशय महत्त्वाकांक्षी आणि दूरगामी कन्सल्टन्सी असून पर्यटन जिल्हा असणाऱ्या सिंधुदुर्गात यानिमित्ताने अतिशय विधायक आणि विकासात्मक कार्य होणार आहे. अल्पावधीतच युवा उद्योजक प्रफुल्ल गोंदावळे यांच्या माध्यमातून विकल्प गगन भरारी घेणार, असे गौरवोद्गार गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी येथे केले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी येथील राजरत्न कॉम्प्लेक्स शॉप क्रमांक ९, सालाईवाडा सावंतवाडी येथे ‘विकल्प टूर्स अँड विकल्प ग्लोबल एज्युकेशन कन्सल्टन्सीचा’ स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर सायंकाळी शानदार शुभारंभ करण्यात आला. या उद्घाटन प्रसंगी गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजू परब, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व युवा नेते विशाल परब, भारतीय जनता पक्षाच्या महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, कणकवलीचे सामाजिक कार्यकर्ते निलेश पारकर यांसह दिग्गज मान्यवर तसेच कन्सल्टन्सीचे संचालक व युवा उद्योजक प्रफुल्ल गोंदावळे, विजय गोंदावळे, कल्पना गोंदावळे, अजय गोंदावळे, शितल गोंदावळे, अंकिता गोंदवळे, आकाश गोंदावळे, सुधा शेरेगार, क्रिश सावंत, राज राऊळ, अवधूत सावंत यांसह विकल्प टीमचे सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी उपस्थित माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर पुढे म्हणाले, युवा उद्योजक प्रफुल्ल गोंदावळे यांनी काळाची पावले ओळखून या क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांची जिद्द, चिकाटी आणि सोबत असलेली त्यांची संपूर्ण टीमची मेहनत नक्कीच त्यांना यशस्वी करणार यात शंका नाही, असा आशावाद श्री. पार्सेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले की, सावंतवाडी शहरात गोंदावळे परिवार अतिशय मेहनती आणि विविध क्षेत्रात काम करणारा परिवार आहे. सामाजिक, राजकीय जीवनात काम करत असताना उद्योग क्षेत्रातही विविध माध्यमातून ते काम करत आहेत, हे सावंतवाडीकरांना नक्कीच भूषणावह असून युवा उद्योजक प्रफुल्ल गोंदावळे यांच्या या संकल्पनेला जी जी मदत लागेल, ती हितचिंतक म्हणून आपण नक्की करू, असेही संजू परब यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व युवा उद्योजक विशाल परब म्हणाले, आयटीसारख्या आजच्या काळातील अतिशय महत्त्वाच्या क्षेत्रात प्रफुल्ल या आमच्या युवामित्राने रोजगार निर्मितीचा ध्यास घेतला असून त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खऱ्या अर्थाने आता आयटी क्षेत्र कात टाकेल आणि त्यासाठी विकल्प कन्सल्टन्सी नक्कीच एक आदर्श ठरेल, असेही युवा नेते विशाल परब म्हणाले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत अजय गोंदावळे, विजय गोंदावळे, व प्रफुल्ल गोंदावळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन भाजपा शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले.
या शुभारंभ प्रसंगी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान विकल्प टूर्स अँड ग्लोबल एज्युकेशन कन्सल्टीच्या माध्यमातून सावंतवाडीकरांना एक नवीन आधुनिक पर्याय उपलब्ध झाला आहे. या नव्या आणि महत्वाच्या क्षेत्रातील कन्सल्टीच्या उद्घाटन प्रसंगी सावंतवाडी शहरातील अनेक नागरिक, तसेच गोंदावळे परिवारावर प्रेम करणारे अनेक स्नेही, विविध पक्षातील पदाधिकारी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी ‘टीम विकल्प’ला शुभेच्छा दिल्या.