कुडाळ तहसील कार्यालयात जमीन विषयक दाव्यांची ४८० अर्धन्यायिक प्रकरणे प्रलंबित-बबन बोभाटे

0
21

निर्णय प्रक्रिया गतिमान न झाल्यास शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा

कुडाळ,दि.१५: जमीन विषयक अनेक दाव्यांची अर्धन्यायिक प्रकरणे महसूल विभागामध्ये प्रलंबित आहेत.आमदार वैभव नाईक यांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर कुडाळ तहसील कार्यालयात माहिती घेतली असता कसत असलेल्या जमिनीत स्वतःला कुळ ठरवून घेण्यासाठीची कुळ कायद्यातील कलम ७० ब अंतर्गत दाव्यांची ३०५ अर्धन्यायिक प्रकरणे आतापर्यंत प्रलंबित आहेत. तर कुळाने जमीन मालकाकडून जमीन विकत घेण्याबाबतची कलम ३२ ग अंतर्गत दाव्यांची १८३ अर्धन्यायिक प्रकरणे प्रलंबित आहेत.शिंदे फडणवीस सरकारचा प्रशासनावर वचक नसल्याने प्रशासनाकडून संत गतीने कामकाज सुरू आहे. एकट्या कुडाळ तालुक्यात ४८० प्रकरणे प्रलंबित असतील तर जिल्ह्यात याची संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये असलेली अनास्था, नवीन योजना राबवण्याचा अधिकाऱ्यांवर असलेला अतिरिक्त भार, त्याचबरोबर सरकारकडून आढावा बैठका होत नसल्याने तसेच पक्षकारांकडून अर्थपूर्ण तडजोडी साठी देखील काही प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे पक्षकार नागरिकांची हेळसांड होत आहे. याकडे प्रशासनाने व शिंदे-फडणवीस सरकारने लक्ष देऊन सदर प्रकरणांची निर्णय प्रक्रिया गतिमान न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here