महावितरणच्या माडखोल विभागीय कार्यालयाचे विभाजन करण्यात यावे…

0
28

रवींद्र मडगावकर यांचे जनता दरबार दरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन

सावंतवाडी,दि.१५: तालुक्यातील महावितरणचा माडखोल विभाग हा भौगोलीक दृष्टया विस्ताराने मोठा असून बहुंताशी भाग हा सह्याद्रीचा डोंगराळ भाग येतो. यामध्ये माडखोल, सांगेली, कलंबिस्त, शिरशिंगे, वेर्ले, सावरवाड, देवसू, ओवळीये, पारपोली, केसरी फणसवडे, आंबोली, चौकुळ, गेळे, पासून ते खडपडे पर्यंत मोठा भाग समाविष्ट आहे.
त्यामुळे त्यासाठी लागणारे लाईनमन इतर कर्मचारी वर्ग अपूरा आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यावर फार ताण पडतो. तरी या माडखोल विभागाचे विभाजन करून आंबोली चौकुळ, गेळे, खडपडे आणि इतर गाव जोडून त्याच्यासाठी वेगळी विभाग निर्माण करावा अशा प्रकारचे निवेदन भाजपा आंबोली मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले.

पालकमंत्र्यांच्या जनता दरबार दरम्यान महावितरणाचे अधीक्षक अभियंता यांना तात्काळ प्रस्ताव पाठवून द्या आपण मंजूर करून देतो असे सांगितले. त्यामुळे मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
माडखोल विभागांमध्ये अतिवृष्टीचे प्रमाण जास्त असल्याने पावसाळ्यात वारंवार झाडे कोसळून वीज वाहिनीवर पडतात, या भागात लाईनमन कमी असल्याने वीज वाहिनीवर झाडे पडल्याने वीज पुरवठा जास्त दिवस खंडीत राहतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होते.
दरम्यान येथील महावितरणाच्या विभागीय कार्यालयाचे विभाजन झाल्यास लाईनमन यांच्यावर कमी ताण पडेल व नागरिकांची गैरसोय होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here