विकल्प टूर्स अँड विकल्प ग्लोबल एज्युकेशन कन्सल्टन्सीचा आज स्वातंत्र्यदिनी शानदार शुभारंभ…

0
17

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपा युवा नेते विशाल परब राहणार उपस्थित..

सावंतवाडी,दि.१५: येथील राजरत्न कॉम्प्लेक्स शॉप क्रमांक ९ , सालाईवाडा सावंतवाडी येथे ‘विकल्प टूर्स अँड विकल्प ग्लोबल एज्युकेशन कन्सल्टन्सीचा’ आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर सायंकाळी ६ वाजता शानदार शुभारंभ समारंभ होत आहे. या उद्घाटन प्रसंगी गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्राध्यापक लक्ष्मीकांत पार्सेकर, सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजू परब भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व युवा नेते विशाल परब यांसह दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या शुभारंभ प्रसंगी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. तरी सावंतवाडीकर नागरिक व मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संचालक प्रफुल्ल विजय गोंदावळे आणि विकल्प टूर्स व विकल्प ग्लोबल एज्युकेशन कन्सल्टन्सी टीमने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here