सिंधुदुर्ग, दि.१७: दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण दहा गरजू विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घेण्यात आले.
दर वर्षी शैक्षणिक वर्षामध्ये दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते. यावर्षी एक मदत गरजू विद्यार्थ्यासाठी या उपक्रमाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा साळशी नं १ येथील चार विद्यार्थी, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चाफेड नं १ येथील दोन विद्यार्थी, वैभववाडी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सांगुळवाडी नं १ येथील एक विद्यार्थी, मालवण तालुक्यातील पेंडूर हायस्कूल येथील एक विद्यार्थी, कुडाळ तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर येथील दोन विद्यार्थी या शैक्षणिक वर्षासाठी देणगीदारांच्या सहकार्याने दत्तक घेण्यात आले. यामध्ये वर्षभर लागणारे शैक्षणिक व इतर आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले.
गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करताना फोटो घेतले गेलेले नाहीत. सदर साहित्य काही ठिकाणी विद्यर्थ्याना प्रत्यक्ष घरी, काही विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकांच्याकडे सदर साहित्य सुपूर्द करण्यात आले.
सदर उपक्रमासाठी रश्मी सावंत, डॉ अनघा गावडे, दिपाली परब, वैभव परब, सचिन प्रभाकर बागवे,मंदार वारंग, हृदयनाथ गावडे, सच्चिदानंद राऊळ, सुनिल करडे,बाबाजी परब,सुनिल धोंड,अमोल भोगले,समता भोगले,समील नाईक,हेमलता जाधव,सुहास गुरव,योगेश येरम,उत्कर्षा वेंगुर्लेकर,संदेश गोसावी,गणेश नाईक इत्यादी दात्यांनी आर्थिक सहकार्य केले. त्यांचे सर्वांचे दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानण्यात आले.