सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजा तर्फे दहावी – बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

0
56

मराठा समाजातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे – सीताराम गावडे

सावंतवाडी,दि.२८: येथील दहावी, बारावीच्या परीक्षेत ६० टक्क्या पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील मुलांचा सकल मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. तरी ज्या मराठा समाजातील मुलांना ६० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत,त्यांनी आपली नावनोंदणी ८४८४८२७९९३ या व्हाट्सअप नंबर करावी असे आवाहन सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचण येऊ नये त्यांना अचूक मार्गदर्शन व्हावे यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत,त्याची माहितीही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे, प्रवेश प्रक्रिये संदर्भात काही अडचणी असल्यास तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,
मराठा समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे तरी यशस्वी विद्यार्थ्यांनी ५ जून पर्यंत आपली नाव नोंदवावीत असे आवाहन सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here