पावणाई रवळनाथ विद्यामंदिर शिरशिंगे च्या विद्यालयाची १००% टक्के निकालाची परंपरा कायम

0
83

कुमारी अपूर्वा देसाई ९४.४०% गुणासह प्रशालेत प्रथम

सावंतवाडी,दि.२७: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत पावणाई रवळनाथ विद्यामंदिर शिरशिंगे विद्यालयाचा निकाल यावर्षीही १००% टक्के लागला असुन कुमारी अपूर्वा देसाई ९४.४०% गुण मिळवत शाळेत प्रथम आली. तर कुमार ओंकार राऊळ व कुमारी भार्गवी शिर्के यांनी अनुक्रमे ८६.२०% व ८५.८०% गुण मिळवत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक शंकर राऊळ, सरपंच दीपक राऊळ, उपसरपंच सचिन धोंड, गावातील ग्रामस्थ व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, यांच्यावतीने दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here