सिंधुदुर्ग,दि.१८: जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांच्या हितासाठी राबवित असलेले उपक्रम व योजना कौतुकास्पद असून केमिस्ट बांधवांची एकजूटही आदर्शवत आहे. तसेच जिल्ह्यातील केमिस्टही प्रामाणिक, शिस्तप्रिय व कायदा पाळणारे आहेत. त्यामुळे कायद्याचे पालन करणाऱ्या केमिस्ट बांधवांना प्रशासनाचेही नेहमीच सहकार्य असते असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे माजी सहाय्यक आयुक्त तथा नाशिक विभागाचे जॉइंट कमिशनर मिलिंद पाटील यांनी केले.
अन्न व औषध प्रशासनाचे
सिंधुदुर्गचे सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील यांचे पदोन्नतीने नाशिक विभागाचे जॉइंट कमिशनरपदी निवड झाल्याबद्दल तसेच अन्न व औषध प्रशासनाचे
सिंधुदुर्ग निरीक्षक अरुण गोडसे यांची सिंधुदुर्गच्या प्रभारी सहाय्यक आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशच्यावतीने कुडाळ येथे आयोजित करण्यात सन्मान सोहळ्यात मिलिंद पाटील बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे, सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, सचिव संजय सावंत, माजी अध्यक्ष अनिल पाटकर, दयानंद उबाळे, खजिनदार विवेक आपटे, सहसचिव प्रसाद तेरसे, संघटन सचिव छोटू तारी, प्रवीण नाईक, मनोहर कामत, बाळासाहेब डोर्ले, श्री पोकळे, विभा खानोलकर, कमरुद्दीन शेख, किशोर कुलकर्णी, प्रवीण जोग, विनायक दळवी, आशिष पाडगावकर, सुभाष कांदळगावकर, दत्ता पारधी, सचिन मुळीक, विजय घाडी, प्रसाद बाणावलीकर, संतोष राणे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रभारी सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी जिल्ह्यातील ९०% औषध दुकानात संगणक प्रणालीद्वारे औषध व्यवसाय सुरू असून औषध विक्रीचे रेकॉर्ड समाधानकारक असल्याचे सांगितले. तसेच औषध व्यवसायातील नियम व कायद्याची अंमलबजावणी करून व्यवसाय केल्यास प्रशासनही केमिस्ट बांधवांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले. यावेळी आनंद रासम यांनी जिल्ह्यातील केमिस्ट बांधव कायद्याचे पालन करूनच ग्राहकांना सेवा देत असून त्याची नोंद ठेवली जाते. केमिस्ट बांधवांच्या या शिस्तप्रिय कामकाजामुळे अधिकाऱ्यांचेही सहकार्य लाभत असल्याचे सांगून यात श्री मिलिंद पाटील तसेच अरुण गोडसे यांच्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला. तसेच असोसिएशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील ९०% औषध दुकानांचे संगणकीकरण झाले असल्याचे सांगितले.
यावेळी अनिल पाटकर, मनोहर कामत, कमरुद्दीन शेख आदी मान्यवरांनी केमिस्ट असोसिएशनच्या कार्याचा गौरव केला तसेच अन्न औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याचीही जाणीव करून दिली. यावेळी नाशिकचे अन्न व औषध प्रशासनाचे जॉईंट कमिशनर मिलिंद पाटील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अन्न व औषध प्रशासनाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांचा साल श्रीफळ तसेच भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय सावंत यांनी केले.