यानिमित्त १८ ते २३ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
सावंतवाडी,दि.१७: येथील श्री देव पिंपळ मारुती मंदिर “मूर्ती प्राणप्रतिष्ठापना” व मंदिराचा “कलशारोहण सोहळा” रविवार दि. २१ एप्रिल २०२४ रोजी संपन्न होणार आहे.
यानिमित्त १८ ते २३ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाने
आज बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी श्री देव पिंपळ मारुती मूर्ती व शिखर कलाशाचे सायंकाळी साडेचार ४.३० ते ७ दरम्यान भव्य मिरवणुकीने स्वागत होणार आहे. गुरुवार दिनांक १८ एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रम १९ एप्रिल रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम सायंकाळी साडेचार(४.३०) ते सहा(६) दरम्यान महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम व रात्रौ नऊ वाजता (९) खेळ पैठणीचा हा खास महिलांसाठी मनोरंजन आणि स्पर्धात्मक कार्यक्रम, २१ एप्रिल रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी सात (७) वाजता कीर्तन, रात्रौ नऊ (९) वाजता चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्य प्रयोग, २१ एप्रिल रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम दुपारी दीड (१.३०) वाजल्यापासून महाप्रसाद सायंकाळी साडेसहा (६.३०) वाजता भजन, रात्रौ नऊ (९) वाजता ओंकार कला मंच सावंतवाडी यांचा कलाविष्कार, सोमवार दिनांक २२ एप्रिल रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम रात्रौ नऊ (९) वाजता एम.जे डान्स यांचा व्हरायटी शो, मंगळवार दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी हनुमान जन्मोत्सव व श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी सात ते साडेनऊ सद्गुरु संगीत विद्यालय प्रस्तुत गीत रामायण हा कार्यक्रम तर रात्रौ दहा (१०) वाजता श्री भवानी सिद्ध भराडी दशावतार नाट्य मंडळाचे बाल दशावतारी नाटक सादर करणार आहेत.
तरी या संपूर्ण कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री.देव पिंपळ मारुती मंदिर देवस्थान सावंतवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

